Moto g64 5G बेस्ट ऑलराऊंडर 5g स्मार्टफोन फक्त १४,००० रुपयात उपलब्ध.


मित्रांनो जर तुम्ही १५००० च्या आत मधे एक चांगला 5g मोबाईल च्या शोधात असाल तर मग ही पोस्ट तुमच्या साठीचं आहे, कारण मित्रांनो मोटोरोला त्यांच्या G सीरीज मधला आणखी एक स्मार्टफोन Moto g64 5g घेऊन येत आहे तो पण फक्त १४,००० च्या आत. चला तर मग बघूया की moto g64 5g मधे काय काय नवीन बघायला मिळणार आहे.

मित्रांनो प्रोसेसर आणि कलर या दोन गोष्टी सोडल्या तर जवळ जवळ moto g64 5g हा moto g54 5g चे अपडेटेड वर्जन आहे असे तरी एकंदरीत दिसून येते.

Moto g64 5G Design

डिझाइन विषयी बोलायचं झाल तर तुम्हाला यात माघच्या बाजुला मॅट टेक्चर मधे 3D अल्ट्रा प्रीमियम डिज़ाइन बघायला मिळणार आहे ८.८९ एमएम ची थीकनेस सह १९२ ग्राम वजन असणार आहे.तसेच याची फ्रेम पॉली कार्बोनेट मधे बनवली गेली आहे.

Moto g64 5G Performance

परफॉर्मन्स बघितला तर यात आहे जगातला पहिला MediaTek Dimensity 7025 प्रोसेसर आहे जो 6nm technology वर कार्य करतो.या प्रोसेसर मधे तुम्हाला दोन महत्वाचे बदल बघायला मिळणार आहे एक म्हणजे याचा क्लॉक स्पीड २.५ GHz मिळेल जो Dimensity 7020 मधे २.२ GHz होता तसेच दुसरा बदल म्हणजे या प्रोसेसर चा ISP आता २०० मेघा पिक्सल कैमरा सपोर्ट करतो. याचा AnTuTu स्कोर जवळ जवळ 5,00,000 पर्यंत बघायला मिळतो. की जो १४,००० च्या आत असणाऱ्या मोबाईल साठी खूप चांगला मानला जातो.

यात LPDDR 4 RAM तर UFS 2.1 स्टोरेज टाइप मिळणार आहे त्यामुळे तुम्ही यात सहज मिल्टिटासकिंग करू शकता तसेच गेम खेळताना हाई ग्राफिक्स वर पण तुम्हाला यात लॅग दिसून येणार नाही.

Moto g64 5G Display

डिस्प्ले मधे यात तुम्हाला पंच होल असलेला १२०Hz रिफ्रेश रेट चा ६.५ चा फुल एचडी प्लस आयपीएस एलसीडी मिळणार आहे.जो HDR10 ला सपोर्ट करतो तसेच २४०Hz चा टच सॅम्पलिंग रेट यात असणार आहे. स्क्रीन प्रोटेक्शन साठी Corning Gorilla Glass 3 चे सरक्षण दिले गेले आहे.तसेच ५६० nit चा पीक ब्राईटनेस बघायला मिळेल.

Moto g64 5G Software

सॉफ्टवेयर मधे यात स्टॉक एंड्राइड १४ असणार आहे यात मोटोरोला ने सांगितल्या प्रमाणे तुम्हाला एंड्राइड १५ चा म्हणजेच १ वर्ष फिक्स अपग्रेड मिळणार तसेच ३ वर्ष सिक्योरिटी अपडेट पण मिळणार आहे.बाकी यात तुम्हाला काही प्री इन्स्टॉल ऍप मिळणार आहे जसे की फेसबुक वगैरे ज्याना तुम्ही मोबाईल मधून uninstall पण करू शकता.लॉक स्क्रीन वर GLANCE बघायला नाही मिळणार ती एक चांगली गोष्ट आहे.तसेच यात एक खास गोष्ट म्हणजे यात तुम्हाला कॉल रिकॉर्डिंग चा ऑप्शन उपलब्ध असणार आहे. मोटो सिक्योर, मोटो हब, मोटो स्पेस या सारखे फिचर्स यात मिळतात तसेच मोटो चे गॅस्चर्स नावाचे फोल्डर दिले आहे त्याच्या मदतीने तुम्ही कस्टमिझेशन करू शकता.

कॅमेरा मधे तुम्हाला मागे ५० मेगा पिक्सल आणि ८ मेगापिक्सल चा ड्यूल कैमरा सेटअप बघायला मिळतो. तसेच समोर सेल्फि साठी १६ मेगा पिक्सल चा सेल्फी शूटर कैमरा दिला आहे.

Moto g64 5G स्टॉरेज आणि उपलब्धता.

moto g64 5g हा दोन मेमोरी ऑप्शन्स मधे उपलब्ध आहे ८ जीबी १२७ जीबी आणि १२ जीबी २५६ जीबी स्टोरेज ८ जीबी १२८ जीबी व्हेरिएंट ची किंमत १४,९९९ आहे तर १२ जीबी २५६ जीबी व्हेरिएंट ची प्राइज़ १६,९९९ अशी आहे त्यात तुम्ही HDFC बँक ऑफर चा उपयोग करुन १००० पर्यंत सूट मिळु शकता.Moto g64 5g फ्लिपकार्ट वर २३ एप्रिल पासून सेल च्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.

Moto g64 5G Full Specifications:

हे पन बघा-Vivo T3x 5G-अविश्वसनीय! विवो चा नविन ६०००mAh बैटरी असलेला 5G फोन मिळणार फक्त ११,९९९/-


1 thought on “Moto g64 5G बेस्ट ऑलराऊंडर 5g स्मार्टफोन फक्त १४,००० रुपयात उपलब्ध.”

Leave a Comment

Exit mobile version