How to Stop ad on Mobile मोबाईल मधे येणाऱ्या जाहिराती पूर्णपणे बंद करा फक्त २ मिनिटात.


how to stop ad on mobile

मित्रांनो काय तुम्ही पण तुमच्या फोन मधे येणाऱ्या ऐड ला वैतागला आहात, कारण की जेव्हा पण आपण आपला फोन वापरत असतो किव्हा एखादी ऍप उघडतो तेव्हा मधेच नको असलेल्या फालतू जाहिरती येतात.त्यामुळे आपल्याला याचा खूप जास्त राग येतो. घाबरू नका मित्रांनो आज मी तुम्हाला या पोस्ट मधे How to Stop ad on Mobile यावर संपूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती देणार आहे की,ज्यामुळे तुम्ही तुमच्या मोबाईल मधे नको असलेल्या जाहिराती किव्वा अ‍ॅड पुर्णपणे बंद करू शकता.

मित्रानो मि तुम्हाला अश्या तीन सेटिंग सांगणार आहेत की ज्यामुळे १००% तुमच्या फ़ोन मधल्या जाहिरती बंद होतील. पण तुम्हाला या तिनही सेटिंग बरोबर बघुन कराव्या लागतील नाहीतर जाहिरती पूर्णपणे बंद होणार नाही. तर मग चला बघुया या तिन सेटिंग.

How to Stop ad on mobile to Deleting advertising ID

मित्रानो सगळ्यात पहिले तुम्हाला तुमच्या मोबाईल च्या सेटिंग मधे जाऊन तिथे तुम्हाला Google नावाचा ऑप्शन दिसेल तुम्हाला Google मधे जाऊन तिथे सगळ्यात पहिला Ads नावाने ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक काययचे आहे क्लिक केल्या नंतर त्या मधे Reset advertising ID नावाचा ऑप्शन दिसेल तो ओपन करायचा आणि त्या मधे जाऊन Delete advertising ID वर क्लिक करा.

How to Stop ad on mobile using Create Private DNS

मित्रांनो ही सेटिंग काही मोबाईल च्या सेटिंग मधेवेगळ्या वेगळ्या ठिकाणी बघायला मिळेल त्यामुळे तुम्ही सरळ सेटिंग मधे सर्वात वरती सर्च बॉक्स मधे Private Dns असे सर्च करू शकता. सर्च केल्या नंतर त्यामध्ये खाली दिल्या प्रमाणे तीन ऑप्शन दिसतील त्यात सेवटचा म्हणजे तिसरा ऑप्शन वर क्लिक करा.तो ओपन झाल्या नंतर त्यात dns.adguard.com असा अड्रेस टाईप करुन सेव करायचे आहे.त्यानंतर तुमच्या मोबाईल मधल्या जाहिराती बंद होतील.जर याने पण तुमच्या जाहिराती बंद नाही झाल्या तर मग तुम्ही एखादा नको असलेला ऍप इन्स्टॉल केलेला आहे त्यामुळे पण मोबाईल मधे जाहिराती येत असतात.

Remove unwanted App

मित्रांनो अशा काही ऍप असतात की ज्या तुम्ही इन्स्टॉल केल्यामुळे मोबाईल मधे नको असलेल्या आणि नको तेव्हा आपल्या मोबाईल मधे जाहिराती येत असतात अशा ऍप कशाप्रकारे तुमच्या मोबाईल मधून रिमूव करायच्या ते बघूया.

मित्रांनो प्रथम सेटिंग मधे जाऊन ऍप मॅनेजमेंट ऑप्शन ओपन करून त्यात अशी बघायची की त्यात त्या ऍप ला लोगो दिलेला नाहीये कारण ही ऍप तुम्हाला स्क्रीन वर दिसणार नाही पण तुमच्या मोबाईल मधे इनस्टॉल असते हे एक मालवेअर ऍप असू शकते त्यामुळे अशी ऍप लगेच रिमूव करुन टाका तसेच काही स्मार्टफोन क्लीनिंग ऍप असतात की ज्या तुम्ही इन्स्टॉल केलेल्या असतात कारण तुम्हाला वाटतं की त्या ऍप मुळे तुमचा मोबाईल फास्ट चालेल पण या उलट त्या ऍप मुळे नको असलेल्या जाहिराती तुम्हाला बघाव्या लागतात आणि तुमचा फोन स्लो होतो त्यामुळे अशा ऍप लगेच रिमूव कराव्यात.

या सर्व सेटिंग्स जर तुम्ही व्यवस्थित केल्या तर मित्रांनो तुमच्या मोबाईल मधे परत कधीच जाहिराती दिसणार नाही.

हे पण बघा Moto g64 5G बेस्ट ऑलराऊंडर 5g स्मार्टफोन फक्त १४,००० रुपयात उपलब्ध.

Realme Narzo 70x 5G: येत आहे 45 Watt चार्जिंग सह सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन,जाणून घ्या अजुन काय नविन मिळनार.


Leave a Comment

Exit mobile version